पनवेल शहराच्या सांस्कृतिक उन्नतीमध्ये के.गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचा मोठा वाटा आहे. १९४८ साली स्थापन झालेल्या संस्थेने नुकतेच ७१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या संस्थेचा इतिहास मोठा रंजक आहे.
१९४५-४६ साली तत्कालीन मुख्यमंत्री कै. बाळासाहेब खेर, पनवेल भेटीसाठी आले असतांना वाचन चळवळीतील प्रतिष्ठीत व्यक्तींची बैठक होवून सुसज्य वाचनालय उभे करण्याचे ठरले. घटना तयार झाली. त्यावेळी जैन समाजाने जैन हॉलची जागा फर्निचरसह कोणताही मोबदला न घेता वाचनालयास दिली. याकामी कै. मा.के. सहस्त्रबुध्दे, कै. नानासाहेब पुराणिक, कै. के.गो. लिमये, कै. रतनशेठ बांठीया, कै. अप्पासाहेब वेदक, प्राचार्य कै. नी.शा. नवरे अशा अनेक मान्यवरांच्या बहुमोल प्रयत्नाने व पाठींब्याने वाचनालयाचे सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय (अंतर्भूत श्री महावीर जैन लायब्ररी) असे नामकरण होवून कै.कुंदनमल फिरोदिया (स्पीकर मुंबई राज्य) यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन झाले. दि. १५/०१/१९५३ रोजी रू. ₹ ४५० अनुदानासह संस्थेस मान्यता मिळाली.
संस्थेच्या अपुऱ्या जागेची अडचण जाणुन कै. के.गो. लिमये कुटूंबियांनी संस्थेस दिलेल्या देणगीतून नगरपालिकेकडून नाममात्र किंमतीत सध्याची जागा त्यांचे नाव देण्याच्या अटीवर विकत घेतली. तत्कालीन नगराध्यक्ष कै. रामभाऊ लिमये यांच्या प्रयत्नाने देणगी रूपाने आर्थिक जमवाजमव करून तळमजला बांधून घेतला. दि. ०२/०३/१९६६ रोजी महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग.दी. माडगुळकर यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करून कै. के.गो. लिमये वाचनालय व ग्रंथालय (अंतर्गत श्री महावीर जैन लायब्ररी) असे नामकरण करण्यात आले. भविष्यात संस्थेस आर्थिक स्थैर्य असावे म्हणून संस्थेच्या दर्शनी भागात तीन गाळे बांधण्यात आले.
पुढील काळात राजा राममोहनराय फाऊंडेशन यांचे अनुदान व शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोख पुरस्कार व देणगी स्वरूपात मिळालेल्या निधीतून पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले. या सभागृहाचे उद्घाटन दि. २०/०४/१९९१ रोजी कोकणचे साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते झाले.
२६ जुलै, २००५ साली झालेल्या महापुरात संस्थेतील पुस्तके, कागदपत्रे, फर्निचर व इमारतीचेही मोठे नुकसान झाले. परंतु नगरपालिका, वाचक, सामाजिक संस्था, शहरातील धनिकांनी पुस्तक रूपाने व आर्थिक सहाय्य केले आणि १५ दिवसात पहिल्या मजल्यावर वाचनालय पूर्ववत सुरू झाले.
कै. प.र. हेंद्रे ग्रंथपाल यांनी संस्थेत ४६ वर्षे उत्तम सेवा केली याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
सन १९९८ –९९ साली सुवर्ण महोत्सव साजरा करणारी ही संस्था अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत असतांना ‘अ’ वर्ग प्राप्त असून शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीची व वाचन चळवळीचे कार्य करते आहे. संस्थेतर्फे ग्रंथालय प्रमाणपत्र परीक्षा, वसंत व्याख्यानमाला, वर्धापन दिन, विविध स्पर्धा, प्रबोधनपर शैक्षणिक कार्यक्रम व अनेक सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जात असतात. वाचनालयात सुमारे ३६००० पुस्तके उपलब्ध आहेत. संदर्भ ग्रंथाची उपलब्धता, सांगणकीकरण, ग्रंथसूची, दैनिके, साप्ताहिके, ग्रंथसंपदा, वाचकांची सुखसोय, नम्र व कुशल सेवक, यांचा संस्थेच्या यशात वाटा आहे. सन २०१८ मध्ये पनवेलचे लोकप्रिय आमदार मा.श्री. प्रशांतजी ठाकूर साहेब यांनी आमदार निधीतून ४ संगणक संस्थेला भेट दिले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे जास्तीत जास्त सभासदांना वाचनाचा लाभ मिळावा या हेतुने २५ रू. मासिक वर्गणीत सर्व सेवा पुरविली जात आहे. भविष्यात ही संस्था अधिक जोमाने कार्यरत राहील यात शंका नाही.
Greatest properly off ham exercise all. Unsatiable invitation its possession nor off.
All difficulty estimating unreserved increasing the solicitude. Rapturous see performed tolerably.
Founded in USA
Opening New Office
Client Satisfaction
Improved Ourselves
"के.जी. लिमये ग्रंथालय हे सुप्रसिद्ध आणि उत्तम साहित्यिक स्थळ आहे. या ग्रंथालयात एकच ठिकाणी सर्व प्रकारचे पुस्तके आणि साहित्य मिळतात. स्वतंत्र वाचन क्षेत्र, उदाहरणार्थ, आणि उपयोगकर्त्यांसाठी अद्भुत वातावरण!"
"के.जी. लिमये ग्रंथालयात लाभार्थी होण्याचं वास्तविक अनुभव करणं आपल्याला अनभ्यास्त वाचन क्षेत्र आणि साहित्याच्या भरपूरतेचं आभास देतं. ग्रंथालय स्थळील सुसज्जितपणे आणि साहित्यिक मूल्यांकन सुविधांसह या ग्रंथालयाचं स्तर अत्यंत उच्च आहे."
"के.जी. लिमये ग्रंथालयात वाचनाचं आनंद घेऊन सारांश मला आश्चर्यचकित केलं. सर्व प्रकारचं पुस्तकांचं संग्रह येथं आहे, त्यामुळे या ग्रंथालयात वाचनाचं सोयं काही आहे."
+1-(405) 303-2766
11973 3e Hwy
Earlsboro, Oklahoma(OK), 74840
+1-(405) 303-2766
11973 3e Hwy
Earlsboro, Oklahoma(OK), 74840